कोल्हापूर (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्यावर देखील कारवाई होणार याच्या भितीने भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द इथल्या अनिल मारुती कांबळे यांचे ह्द्यविकाराने निधन झाले.

अनिल कांबळे हे सावंतवाडी येथे चालक तसेच वाहक म्हणून कार्यरत होते. सुरु असलेल्या संपामुळे शासन आपल्यावर कारवाई करून आपल्याला कामावरून काढून टाकणार. या दबावामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे त्यांनी गेले दोन दिवस अन्नही खाल्ले नव्हते. त्यातच या भितीमुळे त्यांना ह्द्यविकाराचा झटका आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.