मुंबई (प्रतिनिधी) :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या (शुक्रवार) सकाळी एचएन रिलायन्स रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. ठाकरे यांच्या पाठीचे आणि मानेचे दुःखण डोकं वर काढल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. उद्या सकाळी सात ते आठच्या दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही शस्त्रक्रिया स्पाईन सर्जन शेखर भोजराज हे करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत, यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन ते तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार असल्याचे सांगितले.