मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते  आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री  नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस  यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.  आज तर त्याविषयीच्या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार नाही. पण उद्या सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे, याबाबत बोलणार असल्याचे मलिक यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा आरोप केला आहे.  यावर मलिक यांनी उत्तर दिले आहे.

मलिक म्हणाले  की, दीड लाख फूट जमीन आम्ही कवडीमोल दराने माफियांच्या मदतीने खरेदी केल्याबाबतची काही कागदपत्रं फडणवीसांनी लोकांसमोर ठेवली. परंतु  तुम्हाला माहिती पुरवणारे कच्चे खेळाडू आहेत. तुम्ही सांगितले असते, तर मीच तुम्हाला कागदपत्रं उपलब्ध करुन दिली असती. देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे. आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवले होते, त्याविषयी मी उद्या १० वाजता माहिती देईन.