टोप (प्रतिनिधी) : मातीचा पोत व्यवस्थित निर्माण झाला तर शेतकरी काहीही करु शकतो. आर्थिक स्त्रोतासाठी यंत्रणांची जोड घेवून सेद्रिंय शेतीला बळ दिल्यास चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. असे मत खा. धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. ते टोप येथे बायोकेअर कृषी मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

खा. माने म्हणाले की, शेतकरी नसलेले काही लोक माती सुध्दा सोन्याच्या भावाने विक्री करतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चांगली मागणी असुन चढ्या भावाने सेंद्रीय शेतीमाल बाजारात विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आधुनिक सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे असे खा. माने म्हणाले.

या बायोकेअर कृषी केंद्रामध्ये सेद्रिंय लागवड, माती परिक्षण, पाणी परिक्षण, किटकनाशके तसेच शेतीविषय इतर माहीती मिळणार असल्याचे शेतकरी बाळासाहेब काटकर यांनी सांगितले.

यावेळी हातकणंगले पं.स. सभापती डॉ. प्रदीप पाटील, सुहास बुद्धे, अरुण खोब्रागडे, तानाजी पाटील, सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच राजू कोळी, सुनिल काटकर, संतोष काटकर, डाँ.संजय मिरजकर, प्रकाश पाटील, शेतकरी उपस्थित होते.