कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून दररोज सरासरी १३०० ते १४०० कोरोना रुग्ण आढळत होते. आज मात्र त्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत ९३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ९३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २६९ तर करवीर तालुक्यात १७४ रुग्ण आढळून आले आहेत. तर १५, ४८९ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – २६९, आजरा- १७, भुदरगड- ९, चंदगड- ५, गडहिंग्लज- २०, गगनबावडा – ०, हातकणंगले – १४१, कागल- ३१,  करवीर- १७४, पन्हाळा- ४६, राधानगरी- १५, शाहूवाडी – १२, शिरोळ – ८२, नगरपरिषद क्षेत्र – ९६, इतर जिल्हा व राज्यातील- २१ अशा ९३८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ८४, ५३७ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ६६, ६१०

मृतांची संख्या – ५, २०१

उपचार सुरू असलेले रुग्ण – १२, ७२६