कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर २ रुपये व गायीच्या दुधाला १ रुपये खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांच्या भावनेचा आदर केल्याची भावना विविध दूध संघांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. आज (शुक्रवार) संघाच्या प्रकल्पस्थळी प्राथमिक दूध संस्थांमार्फत चेअरमन विश्वास पाटील यांचेसह संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.

महादेव दूध संस्था, चांदे, दत्‍त दूध संस्‍था, वाकरे, कै. शिवाजी पाटील दूध संस्‍था, आमशी, कै. राऊ पाटील दूध संस्‍था, हसूर दुमाला, श्री दत्त दूध संस्था, रेंदाळ, श्री कृष्‍णशक्‍ती दूध संस्‍था, सैनिक टाकळी, अनंत कुलकर्णी दूध संस्‍था, अब्दुललाट, कामधेनू दूध संस्‍था, हलसवडे, शहीद जवान दूध संस्‍था, सावर्डे, भैरवनाथ दूध संस्‍था, रांगोळी, यशोधन दूध संस्‍था, मौजे सांगाव, महालक्ष्‍मी महिला दूध संस्‍था बहिरेश्‍वर, कै. नानूबाई चौगले दूध संस्‍था, माजगाव या संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.

या वेळी विश्वास पाटील म्हणाले की, हा सर्वसामान्‍य दूध उत्‍पादक सभासदांचा संघ आहे. गोकुळमध्‍ये गुणवत्‍ता जोपासत असताना दूध उत्‍पादक, प्राथमिक दूध संस्‍था, वितरक व ग्राहकांच्‍या हिताला महत्‍व दिलेले आहे. गोकुळ परिवारातील सर्व घटकाचे हित जोपासून सर्वसमावेशक कामकाज करू.

कोरोनामुळे जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था, अनेक उद्योगधंदे बंद पडले असताना सुद्धा गोकुळने संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने चालू ठेवून वेगळा ठसा उमटवला. लाखो शेतकऱ्यांना दुधाच्या खरेदी दरात वाढ करून आधार दिला. या संस्‍थेचा आम्‍ही एक घटक आहे असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार संस्‍था प्रतिनिधींनी काढले.

यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह  गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी  पाटील, प्रकाश  पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे,चेतन नरके, अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील आदी उपस्थित होते.