गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी एसटी आगाराचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आज (शुक्रवार) सकाळी आगारातील सर्व ६० बसेस रंगवून सजवण्यात आल्या होत्या. सर्व गाड्यांना पुष्पहार घालून त्याचे पूजन करण्यात आले. तर गारगोटी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संग्रामसिंह कडव यांचे हस्ते केक कापण्यात आला. तर गाडींचे पूजन गारगोटी व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ घाटगे यांचे हस्ते करण्यात आले.

आज प्रवास करण्यासाठी आलेल्या सर्व प्रवाशांना ग्रा.पं. सदस्य प्रकाश वास्कर आणि सुरेश सूर्यवंशी आणि मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे आणि प्रा. आनंद चव्हाण यांनी, प्रवाशांची सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन एसटीची वाटचाल चालू आहे. तसेच एसटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व कर्मचारी, वाहक, चालक यांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक प्रशांत पुजारी, सुरेश सूर्यवंशी, व्यापारी संघाचे सचिव रमेश कारेकर, प्रमोद सोळसे, रंगराव खामकर,  अनिकेत चौगुले, बस स्थानक प्रमुख रुपाली तोंदलें, महेश सावंत, अवधूत पाटील, चालक, वाहक, कर्मचारी आदी उपस्थित होते.