कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंजिनीअरिंग कृती समितीने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात येणाऱ्या अडचणी संदर्भात समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांना निवेदन देत चर्चा केली.

यावेळी लोंढे यांनी, ज्या शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर जाणून घेऊन त्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. कुठल्याही विद्यार्थ्यांला शिष्यवृत्तीमुळे कुठल्याही कागदपत्रांसाठी अडवले जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील प्रश्न मार्गी लागणार आहे.

यावेळी समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अशितोष डोंगळे, शहराध्यक्ष यश साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.