गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर शासकीय प्रतिनिधी म्हणून बाजीराव कुंडलिक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकुमार ढेंगे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. या पदी चव्हाण यांची निवड झाल्याचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे, अवर सचिव वि. व. दळवी यांनी पाठवले आहे.

बाजीराव चव्हाण हे भुदरगड तालुक्यामध्ये राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या पत्नी सौ. विजयमाला चव्हाण यांनी भुदरगड पंचायत समितीचे उपसभापतीपद भूषवले आहे. बाजीराव चव्हाण यांचे मौनी विद्यापीठातून पदवीधर झाले आहेत.  ज्या शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केले त्याच संस्थेत शासकीय प्रतिनिधी म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळणे, ही खूपच आनंदाची गोष्ट असल्याचे प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

या निवडीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील, आ. प्रकाश आबिटकर यांचे सहकार्य लाभले आहे.