मुंबई (प्रतिनिधी) : माजी भारतीय क्रिकेटर आणि १९८३ क्रिकेट विश्वचषकाच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या यशपाल शर्मा यांचे आज (मंगळवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

यशपाल शर्मा यांनी १९८३ च्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ८९ धावांची धमाकेदार खेळी केली होती. ज्यामुळे भारताने पहिल्याच सामन्यावर विजयाची मोहोर उमटवली होती. तर विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये त्यांनी इंग्लंडविरोधात ६१ धावांची जबरदस्त खेळी केली होती.

यशपाल शर्मा १९८० च्या दशकात भारताचे प्रमुख आणि विश्वासू बॅट्समनपैकी एक होते. १९८३ वर्ल्ड कपमध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ८९ धावांची मोलाची खेळी केली होती. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्यांनी ६१ रन केले. भारताने या सामन्यात इंग्लंडचा ६ विकेटने पराभव केला आणि यशपाल शर्मा सर्वाधिक रन्स करणारे खेळाडू ठरले होते. याच सामन्यात त्यांनी इंग्लंडचे दिग्गज बॅट्समन अॅलन लॅम्ब यांना डायरेक्ट हिट करुन रनआऊट केले होते.