पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांच्या ३६१ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शासनाने दिलेल्या नियमांच्या अधिन राहून समाधीस्थळावरती नगराध्यक्षा रुपाली धडेल, रवींद्र धडेल, सयाजी झुंजार, भिमराव काशिद, भगवान चित्ते यांच्या हस्ते नरवीर शिवा काशिद यांच्या समाधीवर अभिषेक आणि पूजन करणेत आले. यावेळी स्वामीनिष्ठ शिवा काशीद यांच्या जयजयकारांच्या घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी संवर्धन समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, उपाध्यक्ष विश्वास गंगधर, पन्हाळा तालुकाध्यक्ष सदाभाऊ सुर्यवंशी, करवीर तालुकाध्यक्ष बाळासो साळोखे, मनोज टिपूगडे, रवी काशिद, प्रवीण काशिद, सुनिल काशिद, आनंदा काशिद, संजय काशिद, गजानन शिंदे आदी उपस्थित होते.