कोल्हापूर (प्रतिनिधी) :  गोकुळ दुधसंघाच्या शासननियुक्त संचालक पदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत आज (मंगळवार) जारी करण्यात आला.

हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावचे असलेले मुरलीधर जाधव गेल्या वीस वर्षांपूहन अधिक काळ शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आज गोकुळ दुधसंघाच्या शासननियुक्त संचालक पदी निवड झाल्याचे आदेश कार्यासन अधिकारी अस्मिता जावडेकर यांनी जारी केले.

या निमित्ताने गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला आणखी एका पदाची लॉटरी लागली आहे. शिवसेनेत गेले वीस वर्षे प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ मिळाल्याच्या भावना मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केल्या.