कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार कोसळत असल्याने सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पुन्हा तब्बल ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई,  इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील खडक कोगे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली आहेत.

जांबरे, जंगमहट्टी, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प आणि वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. कोयना धरणात १०५.२६ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात १२३.०८१ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये असा : तुळशी ९८.१०, वारणा ९७४.१९, दूधगंगा ७१९.१२, कासारी ७७.५२, कडवी ६९.५५, कुंभी ७६.६६, पाटगाव १०५.२४२, चिकोत्रा ४३.११५, चित्री ५३.४१४, जंगमहट्टी ३४.६५१, घटप्रभा ४४.१७०, जांबरे २३.२३० असा आहे.