वीर शिवा काशीद स्मारक सुशोभिकरणासाठी ५० लाख मंजूर…

आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून प्रत्येकी २५ लाख

0
113

पन्हाळा (प्रतिनिधी) : वीर शिवा काशीद यांच्या स्मारक सुशोभिकरणासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याचे पत्र आज (सोमवार) नियोजन आयोगाला देण्यात आले.

पन्हाळा येथील बुधवार पेठेमध्ये असणाऱ्या वीर शिवा काशिद स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी आम. सदाभाऊ खोत यांच्या फंडातून पंचवीस लाख आणि आम. गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून पंचवीस लाख रुपये मंजूर झाले आहेत. याचे पत्र नियोजन आयोगाला देण्यात आले.

यावेळी पन्हाळा तालुकाध्यक्ष सचिन शिपुगडे, बुधवारपेठेचे सरपंच केदार उरूणकर, माजी सरपंच अमर पाटील, नाभिक समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here