बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे आरोग्यवर्धिनी अंतर्गत कार्यरत कोरोना सर्वेक्षण १७ पथकाचे काम समाधानकारक असून सुमारे ४० टक्के सर्वेक्षण झाले आहे. पथकांनी स्वतःची काळजी घेत काळजीपूर्वक तपासणी करत सर्वेक्षण माहिती मोबाईल अॅपवर भरण्याचे आवाहन पन्हाळा तहसीलदार रमेश शेडगे यांनी केले.

ते बोरपाडळे येथील जय मल्हार सभाग्रहामध्ये १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या विशेष कोरोना सर्वेक्षण आढावा बैठकीत बोलत होते. सर्वेक्षण पथकातील आशासेविका, अंगणवाडी, शिक्षक, स्वयंसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक यांना शेडगे यांनी सूचना आणि मार्गदर्शन केले.

मोबाईल अॅप ओपन होत नसल्याबाबत काही कर्मचाऱ्यांनी तक्रारी मांडल्या. बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऑचल रंगारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे, विस्तार अधिकारी एम. बी. चौगले, सरपंच गीतांजली कोळी, ग्रामसेवक विनोद पाटील, काशिनाथ मेंडके, पर्यवेक्षक संपत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आभार अनिल मोरे यांनी मानले.