जिल्ह्यात दुपारी १ पर्यंत ३८.१४ टक्के मतदान…

कागलमध्ये सर्वाधिक तर इचलकरंजी सर्वात कमी मतदान  

0 177

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार) सकाळी ७ च्या सुमारास सुरुवात झाली. पावसाच्या शक्यतेमुळे सकाळी मतदारांनी लवकर मतदान करणे पसंत केले. आज दुपारी १ पर्यंत जिल्ह्यात सरासरी ३८.१४ टक्के मतदान झाले आहे. कागल मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४४.२४ तर इचलकरंजी मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे  ३१.९२ टक्के मतदान झाले आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघामध्ये ३५.७६ टक्के, राधानगरी ४४.०९ टक्के, कागल ४४.२४ टक्के, कोल्हापूर दक्षिण ३५ टक्के, कोल्हापूर उत्तर ३०.३८ टक्के, करवीर ४१.६७ टक्के, शाहुवाडी ४२, हातकणंगले ३७.०५, इचलकरंजी ३१.९२, शिरोळ ३७.०८ टक्के मतदान झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More