कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वांनाच नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची तयारी अनेकांकडून सुरू आहे. नव्या वर्षात महत्वाच्या २४ सुट्या मिळणार आहेत. यामुळे नव्या वर्षातील पर्यटनाचेही नियोजन करता येणार आहे.

काही दिवसांतच २०२० हे वर्ष सरणार आहे. महामारी, पूर, अतिवृष्टी, वादळ, चक्रीवादळ, आर्थिक संकट अशा अनेक आव्हानांचा सामना करतानाच अखेर हे खडतर वर्ष संपत आहे. यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे अनेकांच्या जीवनाची घडी विस्कटली. काहींना नोकरीला मुकावे लागले, तर काही मंडळींच्या सहलींचे बेत रद्द झाले. सातत्याने लावली जाणारी टाळेबंदी आणि त्यामुळे पर्यटन स्थळे किंवा आणखीही ठिकाणी ये- जा करण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध या साऱ्यामुळे अनेकांची मानसिक कोंडी झाली. यापार्श्वभूमीवर नवीन वर्ष तरी आनंदाचे जावे, अशी अनेकांची अपेक्षा आहे.

येणारे वर्ष हे अतिशय सकात्मक आणि तितकेच आनंददायी असेल या आशेसह आतापासूनच २०२१ मधील सुट्ट्यांचे बेत आखले जात आहेत.

नव्या वर्षातील प्रमुख सुट्या अशा : १ जानेवारी, १४ जानेवारी, २६ जानेवारी, १६ फेब्रुवारी, १९ फेब्रुवारी, ११ मार्च, २९ मार्च, २ एप्रिल, १३ एप्रिल, १४ एप्रिल, १४ मे, २६ मे, २१ जुलै, १६ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, ३० ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, १० सप्टेंबर, १५ ऑक्टोबर, १९ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर, ५ नोव्हेंबर, १९ नोव्हेंबर, ३१ डिसेंबर २०२१.