राज ठाकरे यांना दुखापत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. टेनिस खेळताना त्यांच्या डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. ही दुखापत काळजी करण्याइतकी मोठी नाही. त्यांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावले आहे. मनसे अध्यक्ष ठाकरे यांचे कला आणि… Continue reading  राज ठाकरे यांना दुखापत

शेतकरी आंदोलनासंबंधी भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

बेंगळुरू (वृत्तसंस्था) : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे. अशातच कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदाराने शेतकरी आंदोलनावरून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन फसवे आहे. पैसे घेऊन शेतकरी आंदोलन करत आहेत’, असा दावा भाजप खासदाराकडून करण्यात… Continue reading शेतकरी आंदोलनासंबंधी भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : कृषी कायद्यांना स्थगिती   

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी झाली. न्यायालयाने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली व समिती स्थापन करण्याचा… Continue reading शेतकऱ्यांना मोठा दिलासा : कृषी कायद्यांना स्थगिती   

पोरगी पाहून लग्न करून द्या ; युवकाचं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

मुंबई (प्रतिनिधी) : एका तरूणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, अशी मागणी केली आहे. सध्या या युवकाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माझे सध्या वय ३५ वर्ष झाले असून आजपर्यंत माझे लग्न झालेले नाही. त्याचे कारण असे की मी मागील सात वर्षांपासून… Continue reading पोरगी पाहून लग्न करून द्या ; युवकाचं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

‘सीरम’च्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे देशभरात वितरण सुरू

पुणे (प्रतिनिधी) : कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचे वितरण आज पहाटे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून सुरु झाले. लस घेऊन जाणारे तीन ट्रक पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आणि तेथून लस पोलिस बंदोबस्तात देशातील १३ ठिकाणी रवाना करण्यात आली. पुण्याच्या डीसीपी नम्रता पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून या लस घेऊन जाणाऱ्या वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. लसीची… Continue reading ‘सीरम’च्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे देशभरात वितरण सुरू

शॉर्टकटमुळे श्रीपाद नाईकांच्या वाहनाचा अपघात  

हुबळी (वृत्तसंस्था) : कर्नाटकमधील अंकोला तालुक्यात हिल्लूर-होसकांबी गावाजवळ केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि स्वीयसहायकाचा मृत्यू झाला. त्यांच्या गाडीचा दुसऱ्या कोणत्याही वाहनाला धडकून नाही, तर चालकाने निवडलेला चुकीचा रस्ता आणि नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. नाईक आणि त्यांच्या कुटुंबातील चार जणांनी येळ्ळापूर येथे सकाळी गंटे… Continue reading शॉर्टकटमुळे श्रीपाद नाईकांच्या वाहनाचा अपघात  

हुपरी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी लालासाहेब देसाई यांची निवड 

हुपरी (प्रतिनिधी : हुपरी (ता.हातकणंगले) येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी लालासाहेब शंकरराव देसाई यांची तर उपाध्यक्ष म्हणून बाबासाहेब रावसाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते यांना निवडीचे पत्र देण्यात आले. लालासाहेब देसाई मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून युवक काँग्रेसचे पंधरा वर्षापासून शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार… Continue reading हुपरी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी लालासाहेब देसाई यांची निवड 

‘आजरा अर्बन बँके’ची निवडणूक बिनविरोध

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आघाडीची बँक आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. सोमवारी (दि.११) अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. १८ जागांसाठी १८ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. आज (बुधवारी) दुपारी ३ वाजता आजरा येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोधची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे… Continue reading ‘आजरा अर्बन बँके’ची निवडणूक बिनविरोध

‘गोडसाखर’ कर्मचाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा ; मग आम्ही कोर्टात का जाऊ ?  

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज साखर कारखाना आम्हा कर्मचाऱ्यांचा, शेतकरी, सभासदांचा आहे. तो तुमच्या-आमच्या घामावर उभा आहे. आज कारखाना ‘ब्रिस्क’  पुणे या कंपनीकडे चालवायला दिला आहे. पण या कंपनीशी झालेला करार इंग्रजी भाषेत आहे. हा करार मराठीमध्येच हवा. कर्मचाऱ्यांनी गुलामासारखे वागू नये. आपण कुणाच्या घरचे नोकर नाही हे लक्षात घेऊन काम करा. हा आमचा कारखाना आमचा… Continue reading ‘गोडसाखर’ कर्मचाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा ; मग आम्ही कोर्टात का जाऊ ?  

संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांना मिळावी : शिष्टमंडळाची मागणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजूरी मिळूनही वर्षभरापासून तर जुन्या लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून अनुदानच मिळाले नाही. त्यामुळे या निराधार लाभार्थ्यांची ससेहोलपट होत आहे. याप्रश्‍नी तातडीने लक्ष घालून निराधारांना न्याय मिळवून द्यावा, अशा मागणीचे निवेदन आज (सोमवार) इचलकरंजीत आ. प्रकाश आवाडे यांना शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आले. यावेळी आमदार आवाडे यांनी… Continue reading संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांना मिळावी : शिष्टमंडळाची मागणी

error: Content is protected !!