कागलमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी, शाळांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शिक्षण विभाग पंचायत समिती, कागल यांच्यावतीने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च माध्यमिक (५वी), पूर्व माध्यमिक (८वी) शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवोदय विद्यालय प्रज्ञाशोध परीक्षा (जि. प.) पात्र विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, डॉ. जे पी नाईक ‘माझी शाळा समृद्ध शाळा’ उपक्रमांतर्गत शाळांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागलच्या… Continue reading कागलमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी, शाळांचा सत्कार…

इचलकरंजी पालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार… : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपालिकेची आगामी निवडणूक ताराराणी पक्षातर्फे स्वबळावर लढविण्यात येतील, अशी घोषणा आ. प्रकाश आवाडे यांनी आज (शनिवार) ताराराणी आघाडीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केली. जो सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासह पक्ष संघटन बळकट करेल, त्यालाच पाठबळ दिले जाईल. तसेच ताराराणी पक्षाच्या कार्यकारिणीची घोषणाही लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आ. आवाडे म्हणाले की, सर्वसामान्यांचे… Continue reading इचलकरंजी पालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार… : आ. प्रकाश आवाडे

‘सामना’तील टीकेला अण्णा हजारेंचे सडेतोड प्रत्युत्तर…

नगर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्यामुळे शिवसेनेचे वाचाळ नेते, खासदार संजय राऊत यांनी आज (शनिवार) ‘दै. सामना’च्या अग्रलेखातून त्यांच्यावर खरपूस टीका केली होती. या टीकेला अण्णा हजारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी चाळीस वर्षांत २० वेळा विविध प्रश्नांवर तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात आंदोलने मी केली आहेत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत सहा मंत्री… Continue reading ‘सामना’तील टीकेला अण्णा हजारेंचे सडेतोड प्रत्युत्तर…

वीज कनेक्शन तोडून दाखवाच ! मग… : राजू शेट्टी (व्हिडिओ)

लॉकडाऊन काळातील वीजबिलाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी अतिशय आक्रमक पवित्र घेत सरकारला इशारा दिला आहे.  

इचलकरंजीतील युवकाच्या खुनाचा अवघ्या १८ तासांत छडा : तिघांना अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूर येथील शुभम दीपक कुडाळकर (वय २६, रा. मंगळवार पेठ) याच्या खुनाचा छडा अवघ्या १८ तासांत लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून शुक्रवारी रात्री त्याचा खून केल्याची कबुली तिघा आरोपींनी दिली आहे. सूरज शामराव कुंभार (वय २७, रा. कुडचे मळा,  इचलकरंजी), संकेत उमेश म्हेत्रे (२३, रा.… Continue reading इचलकरंजीतील युवकाच्या खुनाचा अवघ्या १८ तासांत छडा : तिघांना अटक

भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (शनिवार) गांधी मैदानात दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. या वेळी राष्ट्रपित्याच्या पुतळ्यासमोर ‘अमर रहे, अमर रहे महात्मा गांधी अमर रहे, जिंदाबाद जिंदाबाद महात्मा गांधी जिंदाबाद यासह केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात कॉ. चंद्रकांत… Continue reading भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर कोरोना अपडेट : ७४ जणांवर उपचार सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शनिवार) दिवसभरात ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील चोवीस तासात ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १, ०४९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील ४, हातकणंगले तालुक्यातील १ आणि करवीर तालुक्यातील २ अशा ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : ७४ जणांवर उपचार सुरू

‘ब्रिस्क’ला ‘गडहिंग्लज’चा पुळका का..?

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : ब्रिस्क फॅसिलिटीज या व्यावसायिक कंपनीने २०१३ साली करार करून गडहिंग्लज तालुक्याची अर्थवाहिनी असणारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना दहा वर्षांसाठी चालवायला घेतला. तेव्हापासून त्यांना हवा तसा चालवलाही..! पण सध्या प्रतिटन ५०० ते ६०० रुपये तोटा सोसून आपण कारखाना सुरू ठेवल्याचे ‘कंपनी’ सांगत आहे. शिवाय करारामध्ये अंतर्भूत नसलेल्या ३४ कोटी… Continue reading ‘ब्रिस्क’ला ‘गडहिंग्लज’चा पुळका का..?

कोल्हापूरवासीयांची ‘शहाळ्याला’ वाढती पसंती ; व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल (व्हिडिओ)

जसजशी कोल्हापूरकरांनी आरोग्यविषयक जागृती वाढत आहे, तसतशी ‘शहाळ्याला’ मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. त्यामुळेच शहरात शहाळे खरेदी-विक्रीमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत आहे. ‘लाईव्ह मराठी’चा खास रिपोर्ट…  

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे कोल्हापुरात धरणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (शनिवार) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यानं शेतकरी अडचणीत येणार आहेत. हे कायदे शेतकरी हिताचे नसून… Continue reading कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे कोल्हापुरात धरणे

error: Content is protected !!