महाविकास आघाडी सीमावासीयांच्या पाठिशी : उदय सामंत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून सीमावासीय १ नोव्हेंबरला मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात काळा दिवस पाळतात. या दिवशी आज बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकार मुस्कटदाबी करत आहे. म्हणून शिवसेनेसह  महाविकास आघाडी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहील,  अशी ग्वाही उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, आज कर्नाटकच्या सीमा… Continue reading महाविकास आघाडी सीमावासीयांच्या पाठिशी : उदय सामंत

तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच बेळगाव महाराष्ट्रात असेल : हसन मुश्रीफ  

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : ‘चंद्रसूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील, अशी दर्पोक्ती करणाऱ्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. ‘चंद्रसूर्याचं कशाला घेऊन बसलात? तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे. संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा… Continue reading तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच बेळगाव महाराष्ट्रात असेल : हसन मुश्रीफ  

ठाकरे सरकारला औरंगजेब म्हणणे समित ठक्करला पडले महागात  

नागपूर (प्रतिनिधी) : ट्वीट करत ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना पेन्ग्विन, असे म्हटल्याप्रकरणी समित ठक्करला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे. २४ ऑक्टोबर रोजी नागपूर पोलिसांनी समित ठक्करला राजकोट मधून ताब्यात घेऊन त्याला २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने  ५ दिवसांची… Continue reading ठाकरे सरकारला औरंगजेब म्हणणे समित ठक्करला पडले महागात  

आता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने  अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया अद्यापही झालेली नाही. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर इयत्तांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. अकरावी सायन्स, कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना… Continue reading आता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मंत्रिपद, ५० कोटींची ऑफर : काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

भोपाळ (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांवर होत असलेल्या पोट निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला असताना काँग्रेसच्या नेत्याने भाजपवर आरोप केले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मंत्रिपदाची आणि ५० कोटी रुपयांची ऑफर ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार उमंग सिंघार यांनी केला आहे. या आरोपानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली… Continue reading भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मंत्रिपद, ५० कोटींची ऑफर : काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

error: Content is protected !!