‘कोविशील्ड’वरील आरोप चुकीचे ; ‘त्याच्या’वर १०० कोटींचा दावा लावणार ! : ‘सीरम’चा इशारा

पुणे (प्रतिनिधी) :  ‘कोविशील्ड’ लसीवर चेन्नईतील स्वयंसेवकाने घेतलेले आक्षेप चुकीचे आहेत. त्याने संस्थेवर केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळे संस्थेची बदनामी झाली असून त्याच्याविरोधात १०० कोटी नुकसानभरपाईचा दावा करणार असल्याचा इशारा सीरम इन्स्टिट्यूटनं दिला आहे. ‘कोव्हिशील्ड’ ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-अमेरिकन कंपनी ‘अॅस्ट्राझेनेका’ विकसित करीत आहेत. भारतात त्याचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. या लसीची… Continue reading ‘कोविशील्ड’वरील आरोप चुकीचे ; ‘त्याच्या’वर १०० कोटींचा दावा लावणार ! : ‘सीरम’चा इशारा

‘बिग बॉस’ फेम बेळगावकर अभिनेत्री विवाहबंधनात

बेळगाव (प्रतिनिधी) : बिग बॉस फेम आणि येथील अभिनेत्री सई लोकूर विवाह बंधनात अडकली. मराठमोळ्या सईने तीर्थदीप रॉयसोबत लगीनगाठ बांधली. सईने या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सईच्या या विवाहसोहळ्याची चर्चेला उधाण आले होते. सई आणि तिर्थदीप यांचा विवाहसोहळा बेळगावात पार पडत आहे. या सोहळव्यातील अनेक विधींचे फोटो सईने… Continue reading ‘बिग बॉस’ फेम बेळगावकर अभिनेत्री विवाहबंधनात

आकुर्डे सरपंचपदी गीता पाटील यांची निवड

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथे राजकीय समझोत्यानुसार लोकनियुक्त सरपंच मनिषा प्रकाश पाटील यांनी तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्या गीता भगवान पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून कळे मंडळ अधिकारी सुरेश ठाकरे यांनी काम पाहिले.   स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेविका शिंगाडे यांनी केले. निवडीनंतर… Continue reading आकुर्डे सरपंचपदी गीता पाटील यांची निवड

मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, खा. संभाजीराजे यांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘सुपर न्यूमरी’ आणि मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची बुधवारी (दि.२) मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ११ वी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे. खा. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘सुपर न्यूमरी’ पद्धतीने… Continue reading मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, खा. संभाजीराजे यांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेत आत्महत्या केली आहे. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर… Continue reading ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

डिएगो मॅराडोना यांच्या स्मरणार्थ सेक अकॅडमीतर्फे ‘जग्लींग स्पर्धा’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अर्जेंटिना संघाचे माजी स्टार दिग्गज खेळाडू डिएगो मॅराडोना यांच्या स्मरणार्थ जुना बुधवार पेठ येथील सेक अकॅडमीच्या वतीने जग्लींग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १४ आणि १७ वर्षे वयोगटातील २५ खेळाडूंनी सहभाग घेतला. विजेत्या खेळाडूना अकादमीचे फुटबॉल किट बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. जुना बुधवार पेठेतील टर्फ मैदानावर ही स्पर्धा झाली. त्याआधी मॅराडोना… Continue reading डिएगो मॅराडोना यांच्या स्मरणार्थ सेक अकॅडमीतर्फे ‘जग्लींग स्पर्धा’

कोल्हापूर महापालिकेतर्फे छ. ताराराणी यांना आदरांजली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात महापालिकेच्या वतीने छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (सोमवार) कावळा नाका येथील छ. ताराराणी यांच्या पुतळयास प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता चेतन आरमाळ, संजय भोसले यांच्या सह कर्मचारी उपस्थित… Continue reading कोल्हापूर महापालिकेतर्फे छ. ताराराणी यांना आदरांजली

मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीचे मतदान उद्या (मंगळवारी) १ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत होणार आहे. मतमोजणी गुरूवारी ३ डिसेंबरला होईल. दरम्यान, मतदानासाठी मतदारांना ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदार… Continue reading मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक..

कोरोनामुळे भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत अनेकांणा आपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्व सामान्य जनतेपासून ते दिग्गज व्यक्तींना देखील या महामारीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट… Continue reading कोरोनामुळे भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

‘बांधकाम नियमावली’ पाठपुराव्याबद्दल राजीव परीख यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने सर्वसमावेशक बांधकाम नियमावलीला  नुकतीच मंजुरी दिलेली आहे. ही नियमावली मंजुरी व्हावी, यासाठी क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्याबद्दल परीख यांचा ज्येष्ठ सभासद प्रविणराजे घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   सर्वसमावेशक बांधकाम नियमावली मंजूर प्रक्रियेला बराच कालावधी लागला होता.  पण ती परिपूर्ण व्हावी व लवकर… Continue reading ‘बांधकाम नियमावली’ पाठपुराव्याबद्दल राजीव परीख यांचा सत्कार

error: Content is protected !!