रस्ता डांबरीकरण करण्याबाबत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज ‘ई’ वार्ड, ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक ११-न्यू शाहूपुरी येथील पर्ल हॉटेल ते चर्च चौकापर्यंत खराब झालेला रस्ता डांबरीकरण करण्याबाबत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. न्यू शाहूपुरी पर्ल हॉटेल ते चर्च चौकापर्यंतचा रस्ता हा गेल्या वर्षी ड्रेनेज लाईन करीता खोदण्यात आला होता. येथील नागरिकांनी एक वर्ष चांगल्या पध्दतीने सहनशीलता… Continue reading रस्ता डांबरीकरण करण्याबाबत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन

लाचखोरांविरोधात न घाबरता तक्रारी करा : सुहास नाडगौडा (व्हिडिओ)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताह सुरु असून लाचखोरांविरोधात भयमुक्त वातावरणात तक्रार करावी असे आवाहन पुणे परिक्षेत्रचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांनी केले.  

‘बिलवसुली’साठी डॉक्टरने रुग्ण वृद्धेच्या खात्यातील पैसे परस्पर काढले… : हुपरीत खळबळ

हुपरी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील ‘एका’ हॉस्पिटलच्या डॉक्टरने वृद्ध महिला रुग्णाच्या बिलापोटी तिच्या कर्नाटकातील बँकेतील खात्यातील तब्बल दोन लाख रुपये परस्पर ऑनलाइनने काढून घेतले. यानंतर हतबल महिलेने हुपरी पोलिसांत धाव घेताच डॉक्टरची पाचावर धारण बसली. मग त्याने काही रक्कम या महिलेला परत देऊन प्रकरण ‘शांत’ करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने शहरात मोठ्या प्रमाणात… Continue reading ‘बिलवसुली’साठी डॉक्टरने रुग्ण वृद्धेच्या खात्यातील पैसे परस्पर काढले… : हुपरीत खळबळ

जिल्हा परिषदेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी वाल्मिकी, इंदिरा गांधी यांना आदरांजली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल,महर्षी वाल्मिकी यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आज (शनिवार) साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रा.पं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्या हस्ते फोटोंचे पुजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथही घेण्यात आली. यावेळी चंदगड पं. स.… Continue reading जिल्हा परिषदेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी वाल्मिकी, इंदिरा गांधी यांना आदरांजली…

एका दिवसात ६१ हजारावर दंड वसूल : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात काल (शुक्रवारी) दिवसभरात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकांकडून तब्बल ५०० जणांकडून ६१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न वापरनणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल महानगरपालिका, केएमटी आणि… Continue reading एका दिवसात ६१ हजारावर दंड वसूल : आयुक्त

महापालिकातर्फे सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात सरदार वल्लभभाई पटले, महर्षी वाल्मिकी आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस महापौर सौ.निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहण्यात आली. यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अडकुर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे उद्घाटन

चंदगड (प्रतिनिधी) : अडकुर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून रस्त्यासाठी ५ लाख निधी मंजूर झाला. या निधी अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ काल (शुक्रवार) दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल आपटेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सरपंच यशोधा कांबळे, ग्रामसेवक एस. ए. सोनार, एम. एच. कांबळे, बंडू शिवांगेकर, जयवंत देसाई आदी उपस्थित होते.

‘यामुळे’ सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले…

मुंबई (प्रतिनिधी) : दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले आहेत. काल (शुक्रवारी) MCX वर सोन्याचा व्यवहार ४१८ रुपयांनी वाढून ५० हजार ७०० रुपयांपर्यंत प्रति १० ग्रॅमवर झाला. दिवसाच्या गुरुवारी सोनं ५० हजार २८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. तरीही सोनं आपल्या सर्वाधिक स्तराहून ६ हजारांनी स्वस्त आहे.  चांदीच्या किंमतीत शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली.… Continue reading ‘यामुळे’ सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले…

जखीनपेठ येथील पवनचक्की लंपास करणारी टोळी गजाआड

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील जखीनपेठ येथील पवनचक्की कापून लंपास करणारी टोळी भुदरगड पोलिसांनी गजाआड केली. यात मुख्य सुत्रधारासह ७ जणांना अटक केली आहे. तर दोघेजण फरार झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून ट्रक, मोटरसायकल, गॅस सिलेंडर, कटर आणि पवनचक्कीचे साहित्य असा सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जखीनपेठ येथील पठारावर… Continue reading जखीनपेठ येथील पवनचक्की लंपास करणारी टोळी गजाआड

कंटेनरने धडक दिल्याने तरूणाचा मृत्यू…

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाडीक बंगल्यासमोर कंटेनरची मोटरसायकला धडक दिल्याने तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. विद्याधर गणपती पेंढारे (रा. उचगाव शेवरे ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, सध्या शुक्रवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. हा तरूण हा कामानिमित्त पुणे येथून कोल्हापूरला येत असताना हा अपघात झाला. पेंढारे हा… Continue reading कंटेनरने धडक दिल्याने तरूणाचा मृत्यू…

error: Content is protected !!