बहिरेश्वर गावच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

सावरवाडी (प्रतिनिधी) : सरपंचाचा मनमानी कारभार आणि ठरलेल्या वेळी सरपंचानी राजीनामा न दिल्याने बहिरेश्वर (ता. करवीर) गावच्या  सरपंच साऊबाई बचाटे यांच्यावरील अविश्वासदर्शक ठराव १० मतांनी मंजूर  करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सभागृहात सदस्यांच्या व्यापक बैठकीत या  अविश्वास ठरावावर मतदान झाले. करवीरच्या तहशिलदार शितल भांबरे-मुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. गावच्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता… Continue reading बहिरेश्वर गावच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

नूर-ए-रसूल फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद : आरोग्य राज्यमंत्री

टोप (प्रतिनिधी) : नूर-ए-रसूल फौंडेशनने कोरोनाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपली आहे. रुग्णांशी सलोख्याचे नाते ठेवल्यानेच एका महिन्यात अडीचशेहुन अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असल्याचे मत आरोग्य राज्यमंत्री नाम. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले. ते शिरोली इथल्या मदरसामधील कोव्हिड सेंटरमध्ये बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील शिरोली पु इथल्या मदरसामध्ये कोल्हापुरातील डॉ. असिफ सौदागर यांनी नूर-ए-रसुल फौंडेशनच्या माध्यमातून कोव्हिड… Continue reading नूर-ए-रसूल फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद : आरोग्य राज्यमंत्री

पुनाळ गावचावडी मार्फत कोरोना जनजागृतीचे संदेश…                           

कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दोलत देसाई, तहसिलदार रमेश शेंडगे यांनी आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करुन मोटरसायकलवर नो मास्क-नो एन्ट्री, माझे कुटुंब-माझी जबाबदारी यासह कोरोनाबाबतचे विविध संदेशाचे  स्टीकर लावून पुनाळ, माजनाळ, तळेवाडी या गावात उपक्रम राबवला.       या उपक्रमामध्ये कळे मंडल अधिकारी सुरेश ठाकरे,तलाटी सुनील शेडगे,कोतवाल सुरेश… Continue reading पुनाळ गावचावडी मार्फत कोरोना जनजागृतीचे संदेश…                           

तर मजूर ऊस तोडणार नाहीत : आ. सुरेश धस  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस तोडणी गळीत हंगाम तोंडावर आला आहे. पण ऊस तोडणी आणि वाहतुकीचा दर वाढीचा करार झाल्याशिवाय ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत. या देशात मैला साफ करणाऱ्यांसाठी कायदा होऊ शकतो, तर ऊस तोड कामगारांसाठी का नाही ? असा प्रश्न आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.राज्यातील ऊसतोडणी मजूर व वाहतुकदारांनी रोजगार वाढीसाठी… Continue reading तर मजूर ऊस तोडणार नाहीत : आ. सुरेश धस  

स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : आरोग्य राज्यमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना दिली. आज (बुधवार) सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले,  डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी,… Continue reading स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : आरोग्य राज्यमंत्री

आरटीपीसीआरचे सुधारित दर निश्चित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड १९ तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल आणि आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी शासनाने ७ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार सुधारित दर निश्चित केले आहेत. निश्चित दर सर्व करासहित निश्चित केले असून, कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला या दरापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही. नवीन दरानुसार संकलन ठिकाणावरुन नमुन्याची निवड करणे, नमुन्याची वाहतूक आणि अहवाल देणे, रिपोर्टींग करण्यासाठी… Continue reading आरटीपीसीआरचे सुधारित दर निश्चित

‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाची ‘लोकचळवळ’ व्हावी : शरद मगर

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत असून कांही अंशी त्यात यश येऊ लागले आहे. पण गडहिंग्लज तालुक्यातील कांही शहरी भागाशी सतत संपर्क येणाऱ्या खेड्यापाड्यात अद्यापही सातत्याने बाधीत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता ही साखळी तोडण्यासाठी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाचे रूपांतर लोकचळवळीत करा अशी सूचना गटविकास अधिकारी… Continue reading ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाची ‘लोकचळवळ’ व्हावी : शरद मगर

शिवाजी विद्यापीठ अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलणार..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध विद्याशाखांच्या अंतिम वर्ष, सत्राच्या परीक्षा या शिवाजी विद्यापीठ पुढे ढकलण्याची शक्यता आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लेखणी आणि अवजार बंद आंदोलनामुळे विद्यापीठाचे या परीक्षांच्या तयारीचे नियोजन बिघडले आहे . किमान एक आठवड्याने या परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय अधिकार मंडळाकडून घेतला जाणार आहे. राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या… Continue reading शिवाजी विद्यापीठ अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलणार..?

श्री अंबाबाई मंदीरात नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम होणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री अंबाबाई मंदिरात यंदा नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम प्रती वर्षाप्रमाणे होणार आहेत. मंदीर दर्शनासाठी खुले नसले तरी नऊ दिवस सर्व विधी करण्यात येणार आहे. त्याचे भाविकांना याचे  दर्शन लाईव्ह करण्यात येईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली. यासंबंधीचे पत्रही त्यांनी दिले.      कोरोनामुळे सर्व… Continue reading श्री अंबाबाई मंदीरात नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम होणार

कृषी यांत्रिकीकरण अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती बाबतची माहिती पोर्टलवर ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’या सदराखाली देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व कृषी अवजारे… Continue reading कृषी यांत्रिकीकरण अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

error: Content is protected !!