कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील हॉटेल पॅव्हेलियनमधील राज्यस्तरीय ब्राह्मण गोलमेज परिषदेत ब्राह्मण समाजाला आर्थिक महामंडळ देण्यासह १३ ठराव मंजूर करण्यात आले आहेत. निखिल लातूरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ब्रह्ममित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला.

परिषदेत काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दिल्याचे सांगितले. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा, पुरोहितांना मानधन मिळावे, वर्ग एक आणि वर्ग दोन च्या इनामी जमिनी खासगी मालकीच्या करून द्याव्यात, महापुरूषांच्या बदनामीविरोधात सरकारने कायदा करावा, पुणे येथे दादाजी कोंडदेव, राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुन्हा उभारावेत, बाह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वस्तीगृह उभारावेत, अशा अनेक मागण्यांवर चर्चा झाली.

यावेळी मकरंद कुलकर्णी, विश्वजित देशपांडे, मनोज कुलकर्णी, अॅड. मंदार जोशी, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.