संजीव पुनाळेकर यांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी : श्रीपाल सबनीस

0 1

पुणे (प्रतिनिधी) :  डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या संजीव पुनाळेकर यांच्याविरुद्ध माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजीव पुनाळेकर यांनी श्रीपाल सबनीस यांना ‘मॉर्निग वॉकला जात चला’, असा सल्ला दिला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या ते सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडल्यानंतरच झाली होती. त्यामुळे पुनाळेकर यांच्या वक्तव्याला धमकीचा संदर्भ असल्याचा सबनीस यांचा आरोप आहे. परिणामी या वक्तव्याची पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी श्रीपाल सबनीस यांनी केली. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More