जयपूर विमानतळावर विमानाचा टायर फुटला : १८९ प्रवाश्यांचा वाचला जीव

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  जयपूर विमानतळावर आज (बुधवार) सकाळी स्पाईसजेटच्या एसजी-५८ या विमानाची एमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आली. याचा टायर फुटल्याने या विमानाचं तातडीनं लॅन्डिंग करण्यात आले. या विमानात १८९ प्रवासी होते. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

जयपूर विमानतळावर आज विमानांची चार उड्डाणे रद्द झाली आहेत. गेल्या चार दिवसांत एकूण १६ विमानं रद्द झालीत. सूत्रांच्या माहितीनुसार, एअरलाईन्सकडे गेल्या काही दिवसांपासून क्रू मेम्बर्सची संख्या कमी आहे. त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून विमानांच्या उड्डाणावरही होतोय. यामुळे जवळपास ८०० प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागलाय. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More