सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी सुबोध भावे…

0 1

मुंबई (प्रतिनिधी) :  अभिनेता सुबोध भावेने छोटा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या दर्जेदार भूमिकांनी रसिकांची मने जिंकली आहेत. त्याच्या अलौकिक कामगिरीची दखल म्हणून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर सुबोधची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर संचालक सुबोधची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली असून सुबोध भावेचे नाव या पदासाठी निश्चित करण्यात आले आहे.

संचालक समितीमध्ये पाच जणांची निवड करण्यात आली असून यामध्ये अभिनेत्री निशा परुळेकरचाही समावेश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये हे संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More