वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठ्यांना आरक्षण नाहीच : सुप्रीम कोर्ट

0 3

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी राज्य सरकारला दणका दिला आहे. वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठ्यांना यंदापासून आरक्षण लागू होणार नाही, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. नागपूर खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देणारी राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

सर्व प्रवेश प्रक्रिया राबवावी, आतापर्यंत मराठा आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश शेवटी जागा उरल्यास त्या जागांवर सामावून घ्यावे, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मागील आठवड्यात पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्ये मराठा आरक्षण मिळणार नसल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.


सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यावर वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये १६ टक्के आरक्षण मिळणार होते. मात्र, प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्याने आणि जागा वाटप झाल्याने नागपुरातील काही पालकांनी आरक्षणाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. सरकारने घाईघाईने आणि राजकीय हेतूने हे आरक्षण दिल्याचा आक्षेप या याचिकेत घेण्यात आला होता. त्यामुळे खंडपीठाने नियमाचा आधार घेत यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचा निर्णय दिला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More