विधानसभेसाठी अरुणकुमार डोंगळेंना पाठबळ द्यावे : अनिता डोंगळे

0 2

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरीचा आमदार होण्यासाठी अरूणकुमार डोंगळेंच्या पाठीशी रहा, असे आवाहन अनिता डोंगळे यांनी आज (सोमवार) केले. त्या धामोड पैकी लाडवाडी (ता. राधानगरी) येथे   झालेल्या महिला मेळावा आणि हळदीकुंकू समारंभात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवणे दुध संस्थेचे चेअरमन राजाराम सासमल होते. तर भगवान लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी डोंगळे म्हणाल्या, गेली दोन दशके राधानगरी तालुक्याला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही. आजपर्यंत आघाडी धर्म म्हणून डोंगळें कुटुंबीय सर्वांच्या मागे उभे राहिले आहेत. यासाठी कृतज्ञतेचा एक भाग म्हणून सर्वांनी आम्हाला पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी परिसरातील महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More