विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून

0 2

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १७ जून पासून सुरू होणार आहे. तीन आठवडे चालणा-या या अधिवेशनात कामकाजाचे केवळ १२ दिवस असणार आहेत.

या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प १८ जून रोजी मांडला जाणार आहे. यानंतर २१ व २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. तर राज्यपालांचे अभिभाषण चर्चा १९ व २० जून रोजी होईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेखा ठरवण्यात आली आहे.पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ५ ते १० जून दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More