‘वाराणसी’मधून मोदींविरुध्द तेज यादव ?

0 1

वाराणसी (प्रतिनिधी) : वाराणसी मतदारसंघातून समाजवादी पार्टी आपला उमेदवार बदलू शकते. सपा-बसपा आघाडीतर्फे तेज बहादुर यादव यांना पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात तेज बहादूर यादव पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे आहेत. समाजवादी पार्टीने शालिनी यादव यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शालिनी या माजी काँग्रेस खासदार आणि राज्यसभा माजी उपसभापती श्यामलाल यादव यांच्या सून आहेत. त्यांनी वाराणसी मतदारसंघातून महापौरांची निवडणूक लढविली होती. शालिनी यांनी सोमवारी एसपीमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी त्यांना तिकीट देण्यात आले.

काँग्रेसने प्रियांका गांधी यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्यावर स्वतंत्र जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मोदींना जोरदार लढत देण्याच्या उद्देशानेच सपा-बसपा आघाडीतर्फे यादव यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More