लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी मध्यप्रदेशच्या ‘या’ खासदारांची निवड

0 2

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसांपूर्वी झालेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ने मोठा विजय संपादन केला. ३० मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. आता नव्या सरकारच्या कालावधीतील पहिल्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. अधिवेशनाच्या अध्यक्षपदी भाजपाचे मध्य प्रदेशमधील खासदार डॉ. वीरेंद्रकुमार खटिक यांची निवड करण्यात आली आहे.

वीरेंद्र कुमार हे मध्यप्रदेशमधील टीकमगढचे खासदार आहेत. आता ते सर्व खासदारांना शपथ देतील. या अगोदर हंगामी अध्यक्ष पदासाठी बरेलीचे खासदार संतोष गंगवार व सुलतानपूरच्या खासदार मनेका गांधी यांची नावे चर्चेत होती, मात्र भाजपा नेतृत्वाने वीरेंद्र कुमार खटिक यांना संधी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More