रेडियम व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल करू : आ. क्षीरसागर

0 1

कोल्हापूर (प्रतिनिधी): प्रादेशिक परिवहन विभागाने आजपासून तयार होणाऱ्या वाहनांना डिजीटल नंबर प्लेट सिस्टीम लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील चार हजार व्यावसायिक तर महाराष्ट्र राज्यातील लाखो कामगारांचा रोजगार बंद होणार आहे. याचा शासनाने विचारात न करता लादलेल्या एकतर्फी निर्णयाविरोधात व्यावसायिकांच्यावतीने न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. ते आज (गुरुवार) कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त रेडीयम नंबर प्लेट व्यावसायिकांच्या  प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोर्चाप्रसंगी बोलत होते.

या वेळी आ. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी ए.बी. शिंदे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अमर समर्थ, माजी नगरसेवक दिलीप शेटे, किशोर घाटगे, प्रकाश नाईकनवरे, नगरसेवक सत्यजित कदम, शशिकांत पाटील, सुधीर जाधव, मंगेश पाटील, रोहित पाटील, तानाजी मयेकर, आरिफ पटवेगार, निवास कलबुर्गी, निखील बावडेकर, महेश कुंभार, संजय घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More