राहुल गांधींच्या ठाम भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये वाद…

0 3

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिलेल्या राजीनाम्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अजूनही ठाम आहेत. राहुल यांच्या या पवित्र्यांमुळे देशातील विविध राज्यांमधील प्रदेश काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाले आहेत. येत्या काही दिवसात राहुल यांनी राजीनामा मागे घेतला नाही, तर स्थिती अधिक बिकट होईल, अशी चिंता पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सतावू लागली आहे. 

ही कोंडी फोडण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी पुढाकार घेतला आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहून देशातील प्रदेश काँग्रेसमध्ये निर्माण झालेले कलह मिटवावेत असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. 

राहुल गांधी आता निर्णय घ्यायला हवा असा निर्वाणीचा सल्ला मोईली यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेत देशभरातील प्रदेश काँग्रेसमधील वाद मिटवून पक्षाला दिशा द्यायला हवी, असेही मोईली म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More