राज ठाकरेंकडून शिवसेना टार्गेट…

0 3

मुंबई (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भाषणातून शिवसेनेचं नाव घेऊन टीका केली आहे. भाजपाला निवडून देऊ नका असे आवाहन राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या सभेत केले. मात्र, गेल्या ६ सभांमध्ये कुठेही शिवसेनेचा उल्लेख केला नव्हता. परंतु शिवसेनेचा उल्लेख करत शिवसेनेलाही मतदान न करण्याचं आवाहन राज यांनी प्रथमच केलं. त्यामुळे मुंबईतून शिवसेनेलाही टार्गेट करण्याला सुरुवात झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरात राज ठाकरे यांनी सभा घेतली. या  सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. या सभेत प्रथमच राज ठाकरेंनी शिवसेनेचं नाव घेत शिवसेनला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More