‘या’ अभिनेत्रीला करायचेय सलमानसोबत लग्न…

0 2

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान लग्न कधी करतो? आणि लग्नाआधी त्याची किती जणींसोबत नावं जोडली जातात, यावर आजवर अनेक खुसखुशीत चर्चा तुमच्या कानावर पडल्या असतील. यात स्वतः सलमान खानने कधीच उघडपणे या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पण आजही अनेक अभिनेत्री शा आहेत ज्यांना सलमानसोबत लग्न करायची इच्छा आहे, त्यामध्ये झरीन खानची भर पडली आहे.

सलमानच्याच ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री झरीन खान अल्पावधीतच लोकप्रिय झाली. ती सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही तिला सलमानसोबत नाव जोडण्याची इच्छा आहे. हे तिनेच स्वतः एका कार्यक्रमात बोलून दाखवले आहे.

‘पिंकव्हीला’ या शोमध्ये झरीनला विचारण्यात आले की, तुझ्याबद्दल कोणती अफवा पसरली तर तुला आवडेल?. त्यावेळी तिने दबंग स्टार सलमानचे नाव घेतले. सलमानसोबत नाव जोडलेले मला ऐकायला आवडेल. आमच्या दोघाबद्दल अफवा पसरली तरी मला चालेल असे उत्तर तिने दिले. झरीनच्या या उत्तरावर सलमान ची काय उत्तर देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More