याच्या आधीही सर्जिकल स्ट्राइक केल्या : जनरल डी. एस. हुडा

0 5

जयपूर (वृत्तसंस्था) : ‘लष्कराने या आधीही सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक’ केल्याचे भाष्य २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमधील महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी केले आहे. यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला हुडा यांनी उत्तर दिले आहे. 

डी. एस. हुडा म्हणाले की, देशात सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाकडून सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. ‘भारतीय लष्करानं याआधीही सीमा ओलांडून कारवाया केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

लष्कराच्या कामाचं राजकारण करणं अयोग्य आहे. ‘निवडणुकीच्या प्रचारात लष्कराला आणणं योग्य नाही. निवडणूक आयोगाने देखील तशा सूचना दिलेल्या आहेत. राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचारात लष्कराच्या कामगिरीचा वापर होणं दुर्देवी आहे. दीर्घकालीन परिस्थितीचा विचार केल्यास याचे लष्करावर प्रतिकूल परिणाम होतात,’ असे हुडा यांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या भाषणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत आहेत. मोदींच्या या भाषणांवर काँग्रेसकडून टीका होत आहे. यावर मनमोहन सिंग यांनी मोदींवर शरसंधान साधत म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र लष्करानं केलेल्या कारवायांचा आम्ही कधीही मतांसाठी वापर केला नाही, असे सिंग म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More