यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस : हवामान खात्याचा अंदाज

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुष्काळाने त्रस्त झालेल्या बळीराजाला दिलासा देणारे वृत्त आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आज (सोमवार) मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा भारतात सरासरी ९६ टक्के पाऊस पडेल. नवी दिल्ली येथे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर यांनी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नायर यांनी सांगितले की, सरासरी पाऊस पडण्याची शक्यता ९६ टक्के इतकी आहे. यंदा भारतात मान्सूनचा पाऊस सर्वदूर पडेल, असाही हवामान खात्याचा कयास आहे. जून ते ऑगस्ट या काळात समप्रमाणात पाऊस पडेल, असेही हवामान खात्याने सांगितले. हवामान खात्याच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान खात्याकडून मान्सूनविषयीचा दुसरा अंदाज व्यक्त करण्यात येईल. त्यावेळी देशात किती पाऊस पडेल, याचा आणखी नेमका अंदाज येईल.

मान्सूनवर परिणाम करणारा अल-निनो यंदा तितकासा सक्रिय नसेल. परंतु, उन्हाळ्यानंतर ही परिस्थिती बदलू शकते. या काळात अल-निनो अधिक सक्रिय झाला तर त्याचा परिणाम जून व जुलै महिन्यातील पावसावर होईल. तसे झाल्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची ३२ टक्के शक्यता आहे. त्यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसू शकतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More