नरेंद्र मोदी मूर्ख : सिद्धरामय्या

0 3

बंगळुरू (वृत्तसंस्था) : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. ‘ते (मोदी) मूर्ख आहेत, सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणे ही मोठी चूक आहे’ असे सिद्धरामय्या म्हणाले.

सिद्धरामय्या म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईक हा आपल्या जवानांनी केला होता. हा सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी मोदी स्वत: हातात बंदूक घेऊन गेले होते का ? मग ते या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय का घेत आहेत ? लष्करांकडून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करण्यात आले. ही कारवाई मोदी सरकारच्या काळात झाल्याने पंतप्रधान मोदी त्यांच्या सभांमध्ये याबाबतचा सातत्याने उल्लेख करत असतात आणि कारवाई पार पाडणाऱ्या जवानांचेही कौतुक करतात. काँग्रेससह इतर विरोधक सैन्याच्या कारवाईचे श्रेय मोदी घेत असल्याचीही टीका त्यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More