‘मायावती, मोदींच्या पत्नीची चिंता सोडा, आधी तुम्ही लग्न करा…’

0 3

वाराणसी (वृत्तसंस्था) : मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीची चिंता करू नये. त्यांनी व्यक्तिगत आरोप करू नयेत. आता तुम्हीच लग्न केले तर योग्य राहील, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी वाराणसीत आलेल्या आठवले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीबाबत चिंता वाटत असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याला केंद्रीय मंत्री व रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. आठवले म्हणाले की, मायावती यांना ठाऊक आहे की मोदींची पत्नी शिक्षिका आहेत. त्यांच्यावर कोणीही व्यक्तिगत हल्ला करणे योग्य नाही. मायावती मोदी यांच्‍यावर त्‍यांच्‍या पत्‍नीवरुन टीका करत आहेत. मात्र मायावतींनी लग्‍न केलेले नाही. त्यांनी जर लग्‍न केले असते तर त्‍यांना माहिती असते पती म्‍हणजे काय व पतीची देखभाल कशी केली जाते. आम्‍ही मायावती यांचा आदर करतो मात्र त्‍यांनी अशा पद्धतीचे वक्‍तव्‍य करायला नको होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More