माथाडींचे नेते नरेंद्र पाटील यांना मातृशोक

0 3

मुंबई (प्रतिनिधी) : आ. कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पत्नी, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई (वय ६५) यांचे आज (गुरुवार) अल्पशा आजाराने निधन झाले. नरेंद्र पाटील यांनी नुकतीच सातारा लोकसभा मतदारसंघातून युतीतर्फे निवडणूक लढवली आहे.

माथाडी कामगार चळवळ उभी करताना वत्सलाताई पाटील यांनी आ. अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली होती. अण्णासाहेबांच्या निधनानंतर माथाडी कामगार चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी खंबीरपणे माथाडी नेत्यांना साथ दिली. वत्सलाताई माथाडी कामगार चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत होत्या. त्यांच्या निधनामुळे कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुलगे नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी नवी मुंबईतील तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More