महापालिकेने कौशल्य विकास कृती आराखडा तयार करावा : सचिव के.पी.कृष्णन

0 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेने कौशल्य विकास कृती आराखडा तयार करावा, अशी सुचना भारत सरकार कौशल्य विकास विभागाचे सचिव के.पी.कृष्णन यांनी केल्या. कोल्हापूर महानगरपालिकेला आज (सोमवार) सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या.

केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ अत्योंदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (एनयुएलएम) महापालिकेतर्फे राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, कोल्हापूरची खासियत लक्षात घेवून त्याचे प्रशिक्षण लाभार्थ्यींना देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. त्यासाठी कोल्हापूर शहराच्या सामाजिक, आर्थिकबाबींचा विचार करावा. तसेच पर्यटन विकासाचे नियोजन करताना इंग्रजी, हिंदी, मराठी, तामिळ, केरळ यासारख्या भाषा बोलणारे मार्गदर्शक तसेच निरनिराळया प्रदेशाचे खाद्य पदार्थ तयार करणे. कोल्हापूरी चप्पल, गुळ यासारखे विविध वस्तू बनविण्याचा कृती आराखडा करा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.  

आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, या योजनेमधून ४५ बॅचेस मधून १,३१९ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.  तसेच बचतगटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपआयुक्त मंगेश शिंदे, नगरसचिव दिवाकर कारंडे, एनयूएलएमचे निवास कोळी, विजय तळेकर, रोहित सोनुले आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More