मराठा विद्यार्थ्यांना सरकारचा दिलासा : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबद्दल अध्यादेश जारी

0 2

मुंबई (प्रतिनिधी) : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षण रद्द झाल्याने अन्याय झालेल्या २५० विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारने आज (शुक्रवार) अध्यादेश जारी केला. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे आत्तापर्यंत झालेले प्रवेश तसेच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी बुधवारी निवडणूक आयोगाला केली. या मागणीनंतर दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल करण्यात आली. यानंतर आज अध्यादेश लागू करण्यात आली आहे. याबाबत चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, राज्यपालांची सही झाल्यानंतर अध्यादेश लागू होणार आहे. खुल्या वर्गाला खासगी विद्यालयात शिष्यवृत्ती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

१९५ विद्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर आणि ३२ विद्यार्थी दंतवैद्यकीय या शाखेतील असून त्यांच्यासाठी जागा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. १६ टक्के आरक्षण लागू केल्याने प्रवेश मिळू न शकलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी खासगी वैय महाविद्यालयात किंवा अभिमत विद्यापीठात प्रवेश घेतल्यास त्यासाठी राज्य सरकारकडून मदत केली जाईल. पदव्युत्तर वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ मेपर्यंत मुदत दिली असून ती ३० मे पर्यंत वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सरकारने न्यायालयात केला आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More