ममता बॅनर्जींंचा तोल सुटला… म्हणाल्या, ‘मोदींना कानशिलात मारावीशी वाटते !

0 1

कोलकाता (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणूक प्रचार अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचे चित्र आहे. नेत्यांकडून अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनीही एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना पातळी सोडल्याची घटना घडली आहे. निवडणूक येताच मोदी रामनामाचा जप करत असतात. त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान मी आजवर पाहिला नाही. त्यांच्या कानशिलात मारावीशी वाटते, असं विधान ममता बॅनर्जी यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पुरुलिया येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी हे विधान केलं. मोदींनी ५ वर्षात अच्छे दिन आणण्याच्या गोष्टी केल्या होत्या. परंतु, नंतर त्यांनी नोटाबंदी केली. ते संविधान सुद्धा बदलणार आहेत. भाजपच्या घोषणांवर माझा तिळमात्र विश्वास नाही. पैसा माझ्यासाठी सर्व काही नाही. मात्र मोदी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये येतात आणि टीएमसी लुटारुंचा पक्ष असल्याचा आरोप करतात तेव्हा त्यांच्या कानशिलात मारावीशी वाटते, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

पुरुलियातील आदिवासी गावांबद्दल मोदींना माहिती काय माहिती आहे? आतापर्यंत या भागात ३०० आयटीआय महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. मी प्रचंड संघर्ष केला. पण स्वत:ला विकून किंवा स्वत:चं मार्केटिंग करून राजकारण केलं नाही. संघर्षमय जीवन जगत असल्यानेच मी मोदींना घाबरत नाही, असंही त्या म्हणाल्या. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More