मतमोजणीवेळी हिंसाचार उफाळण्याची शक्यता : केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट !

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान, देशातील काही मतमोजणी केंद्राबाहेर आणि संवेदनशील भागात हिंसाचार उफाळण्याची शक्यता असल्याने केंद्राकडून राज्यांना अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्राच्या गृहमंत्रालयाकडून राज्यांच्या मुख्य सचिवांसह, पोलीस आणि इतर यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या सातही टप्प्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्यामुळे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू – कश्मीरसह दक्षिण हिंदुस्थानातील काही राज्ये आणि ईशान्येकडील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतमोजणीदरम्यान हिंसाचार उफाळू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी,  प्रत्येक राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याकडे लक्ष पुरवण्यात यावे असे सूचनेत म्हटले आहे. त्याचप्रमाणे स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रावर योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More