मणिपूरमधील काँग्रेसच्या १२ आमदारांचा राजीनामा

0 3

इंफाल (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे अंतर्गत वातावरणही खराब होत असल्याचे दिसून येत आहे. देशभरातील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामाचे सत्र सुरू झाले आहे. मणिपूरमधील काँग्रेसच्या १२ आमदारांनी काँग्रेस कमिटीला विविध पदांचे राजीनामे सुपूर्द केले आहे. यावेळी त्यांनी पक्षाकडे राजीनामे सोपावत ‘आम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे अनुकरण करत’ असल्याचे सांगितले.

मणिपूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गैखंगम यांना पक्षाच्या १२ आमदारांनी राजीनामे सोपवले आहेत. यावेळी आमदार म्हणाले की, आम्हाला काँग्रेस पक्षाची काहीच अडचण नाही. आम्ही केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे अनुकरण करत आहोत. आमच्या राजीनाम्याचे केवळ हेच कारण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. मणिपूरमधील दोन्ही लोकसभा जागांवर काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

गैखंगम म्हणाले की, माझ्याकडे काही सहका-यांनी राजीनामे सोपवले आहेत, मात्र मी अजुनही कोणत्याही पत्रकावर स्वाक्षरी केलेली नाही. राहुलजींनी पक्षाला बळकटी देण्याच्या उद्देशाने आपला राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी स्तरावर देखील आम्हाला याचे पालन करावे लागेल. काँग्रेस कार्यकारणी समितीच या १२ आमदारांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More