भुदरगड पंचायत समितीमध्ये सभापतींच्या पुतण्याची महिला सदस्यांना शिवीगाळ ; गुन्हा दाखल

0 3

गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड पंचायत समितीमध्ये आज (मंगळवार) आयोजित करण्यात आलेल्या मासिक सभेमध्ये महिला सदस्यांना अर्वाच्य भाषा वापरून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सभापती सौ. स्नेहल परीट यांचा पुतण्या विद्याधर महादेव परीट याच्यावर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सदस्या सौ. गायत्री संदेश भोपळे यांनी फिर्याद दिली आहे.

भुदरगड पंचायत समितीवर आमदार प्रकाश आबिटकर गटाची सत्ता आहे. पंचायत समिती सभेमध्ये  महिला सदस्यांना वारंवार आबिटकर गटाचे सदस्य सुनील निंबाळकर वारंवार टोमणे मारतात, तर विद्याधर परीट  हा नेहमी आमच्याशी अरेरावीची भाषा करतो, अशी तक्रार महिला सदस्यांनी केली आहे.

आज पं. स. सदस्या आक्काताई नलवडे (आकुर्डे), गायत्री भोपळे, संग्राम देसाई (मडिलगे), मासिक सभा असल्याने उपसभापतीच्या दालनात बचत गटाबाबत चर्चा करीत बसले होते. या वेळी याने तिथे येऊन तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणारे कोण, तुमची लायकी काय अशी विचारणा करीत महिला सदस्यांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली. त्याच्यावर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबद्दल उद्या बुधवारी सकाळी १० वाजता भुदरगड पंचायत समितीवर निषेध मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भाजप व राष्ट्वादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी गारगोटी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन सदस्या सौ. गायत्री भोपळे यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More