भारतीय स्टेट बँकेकडून कर्जदारांना दिलासा…

0 3

मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेने कर्जाच्या व्याजदरात ०.०५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय आज (बुधवार) घेतला आहे. त्यानुसार आजपासून हे नवे दर लागू होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

(जाहिरात – शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो,

आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !

नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी

परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

या आर्थिक वर्षात स्टेट बँकेने तिसऱ्यांदा कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. या आधी बँकेने एप्रिल आणि मे महिन्यात ०.०५-०.०५ टक्क्यांची कपात केली होती. यादरम्यान, आतापर्यंत बँकेने गृह कर्जावरील व्याज दरातही ०.२० कपात केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर दास यांनी रेपो दरात केलेल्या कपातीचा लाभ सामान्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात यावा, असे आवाहन केले होते.

जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक आणि आयडीबीआय बँकांनी आपल्या एमसीएलआर दरात ०.०५ ते ०.१० टक्क्यांची कपात केली होती. रिझर्व्ह बँकेची पुढील बैठक आता दि. ५ ते ८ ऑगस्टदरम्यान होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More