एअरटेलची ३ जी सेवा होणार बंद !

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेली भारती एअरटेल भारतातील ३ जी सेवा बंद करणार आहे. दूरसंचार उद्योग दीर्घकाळ टिकण्यासाठी सेवा दर वाढवण्याची गरज असल्याने भारती एअरटेलचे भारत आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी ३ जी सेवा बंद करण्यावर जोर दिला आहे.

( जाहिरात – 👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

 ‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

गोपाल विठ्ठल म्हणाले, ग्राहक २ जी वरून ४ जी सेवा घेत आहेत. त्यामुळे आम्ही हे अद्ययावतीकरण करीत आहोत. कोलकात्यातील ३ जी नेटवर्क सेवा जूनच्या तिमाहीत बंद झाली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये आणखी सहा ते सात सर्कलमधील सेवा बंद केली जाईल. तर डिसेंबर ते मार्चमध्ये एअरटेलचे संपुर्ण देशातील ३ जी नेटवर्क बंद होईल, असे त्यांनी सांगितले.

कंपनीने सध्या प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न, प्रत्यक्ष वसुलीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. एप्रिल २०२० पर्यंत कंपनी २ जी आणि ४ जी सेवा देईल. त्यामुळे २ जी ऐवजी सर्व स्पेक्ट्रम ४ जीवर स्थापित केले जातील. तसेच नेटवर्कमधील समस्या दूर करण्यासाठी ३ जीच्या ध्वनी लहरींवर ४ जी ध्वनी लहरी सुरू करण्यात येतील. कंपनीचे सध्या ८.४ मिलियन ४ जी ग्राहक आहेत. डाटाचा वापर वाढला असुन भारतीचे ग्राहकांची डाटा वापरशक्ती महिन्याला ११ जीबीपर्यंत पोहोचली असल्याचे विठ्ठल यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More