राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये : काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

0 2

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज (शुक्रवार) विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठक बोलावली होती. या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला गेला. राष्ट्रवादीशी आघाडी असूनही अनेक मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला मदत करत नाहीत, अशी तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

काँग्रेस पुढच्या दोन दिवसात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही मह्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. तर विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली तर त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसला मदत करणार ऩाहीत, अशी शंकाही यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केली.

राष्ट्रवादी ही भाजपलाच मदत करत असल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी न करता वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणीही काही नेत्यांनी या बैठकीत केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More